• Advertisement
 • Contact
More

  अज्ञात वाहनाच्या धडकेत मगर ठार
  वरोरा वनपरीक्षेत्रातील साखरा चारगाव मार्गावरील घटना

  वनपरिक्षेत्र कार्यालय वरोराअंतर्गत येणाऱ्या साखरा चारगाव रस्त्यावर मगर गंभीर जखमी अवस्थेत आढळला. वन कर्मचाऱ्यांनी पशुचिकित्सालयामध्ये उपचाराकरिता नेले असता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
  वरोरा तालुक्यातील चारगाव खुर्द ते साखरा रस्त्यावर मगर जखमी अवस्थेत आढळले. मगर नजीकच्या चारगाव धरणातून बाहेर आल्याचे मानले जात आहे मगराचे वय तीन ते चार वर्षे
  असून वजन जवळपास ६० किलो आहे. मगर वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी होऊन मृत पावले, अशी शक्यता पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जांभळे यांनी वर्तविली. मृत मगरावर वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले