
वरोरा तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून राजस्थान राज्यात घेऊन गेले तिच्यासोबत विवाह करण्यात आला ही बाब पित्याला समजतात पित्याने वरोरा पोलिसात तक्रार दिली वरोरा पोलिसांनी राजस्थान मधून तिघांना ताब्यात घेऊन अटक केली
वरोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून शाडोल तालुका विटवा जिल्हा कोठा राजस्थान येथे घेऊन गेले अल्पवयीन मुली सोबत विवाह पूर्ण केल्याचे समजते याबाबत मुलीच्या पित्याने वरोरा पोलिसात तक्रार दिली या तक्रारीवरून वरोरा पोलिसांचे पथक राजस्थान राज्यात जाऊन रामस्वरूप केसरी लाल बरवा वय 32 छोटूलाल माधव लाल बरवा तस्वीर छोटूलाल बरवा या तिघांना ताब्यात घेऊन कलम 363 34 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली अल्पवयीन मुलीला वडिलांच्या ताब्यात वरोरा पोलिसांनी दिले