• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्गुस येथील मृतकांच्या कुटुंबियांची घेतली भेट, अनाथ झालेल्या बालकांची केली विचारपूस

    आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्गुस येथील अमराई वार्डातील मृतकांच्या कुटुंबियांची आज गुरुवारी भेट घेतली असून अनाथ झालेल्या बालकांची विचारपूस करण्यात आली. तसेच पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना भ्रमणध्वनी द्वारे बालकाच्या संगोपन करण्याबाबत चर्चा केली तसेच या प्रकरणातील संबंधित आरोपींना अटक करावी असे निर्देश दिले. आर्थिक मदत दिले

     तालुक्यातील घुग्घुस येथील अमराई वार्ड क्र.1 येथे राहणारे सुरज माने व रत्नमाला माने या दाम्पत्याचा एकाच दिवशी मृत्यू झाला त्यांची आयुष व आर्यन लहान दोन मुल आहे. आई वडिलांचे छत्र हरपल्याने ते अनाथ झाले आहे.अशातच आज आमदार किशोर जोरगेवार यांनी पीडित कुटुंबीयांना भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले आहे.