• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    आमदार किशोर जोरगेवार समर्थकांची महानगरपालीके समोर नारेबाजी 

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडने आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांविरोधात चार एक्के, दे धक्के आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान शहरातील मुख्य मार्गाने पदयात्रा काढत महानगरपालिके समोर  नारेबाजी केली. आंदोलनाच्या पाश्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. यंग चांदा ब्रिगेडने महापालिकेत आझाद बगीचा, अमृत योजना पाणीपुरवठा, कचरा आणि कोरोना घोटाळा झाल्याचा आरोप करीत चार एक्के, दे धक्के आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यावेळी कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गाने पदयात्रा काढली. यावेळी मनपा विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून निवडणूक काळात दिलेले २०० युनिट मोफत विजेचे खोटे आश्वासन देणाऱ्या आमदार जोरगेवार यांना टार्गेट करीत शहर भाजपने घंटानाद आंदोलन केले. 
    यावेळी आंदोलनातील प्रमुख भाजप नेत्यांना पोलिसांनी अटक केली . या आंदोलनामुळे येत्या काळात शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.