• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    आमदार जोरगेवार समर्थक आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर
    आंदोलनाच्या निमित्ताने गांधी चौकात तणावाचे वातावरण

    महापालिकेतील सत्ताधाऱ्यांविरोधात आमदार किशोर जोरगेवार संस्थापक अध्यक्ष असलेल्या यंग चांदा ब्रिगेडने चार एक्के, दे धक्के आंदोलन आज मनपा समोर करणार आहे. या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून शहर भाजपनेही आमदार जोरगेवार यांनी दिलेल्या मोफत 200 युनिट विजेच्या आश्वासनावरून घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनाच्या निमित्ताने आमदार जोरगेवार समर्थक आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर आले आहेत. भाजपने आंदोलनस्थळी जोरगेवार यांना रेती चोर म्हणून फलक लावला आहे, तर यंग चांदा ब्रिगेडने मनपा सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे कारनामे उघड केले आहे. यामुळे वातावरण चांगलेच गरम झाले आहे.या पाश्वभुमिवर पोलिसांनी दोन्ही आंदोलन थाबवले