
चिमूर क्रांती शहिद स्मृतिदिनानिमित्त पालकमंत्री विजय वडेट्टीवार महामार्गानजिक असलेल्या हुतात्मा स्मारक येथे शहिदांना मानवंदना देऊन मनोगत व्यक्त करीत होते. या दरम्यान आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्या नेतृत्वात बाईक रॅली या ठिकाणी आली. मोठ्याने घोषणा देत रॅली थांबली. यामुळे भाजप-काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला. विना परवानगी बाईक रॅली काढून पोलिस विभागाच्या दिशानिर्देशाचे पालन केले नसल्याने आमदार भांगडिया यांच्यासह आठ कार्यकर्त्यावर गुन्हा नोंद झाल्याची माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली.