• Advertisement
 • Contact
More

  एसीसी नकोडा परीसरातील एटीएम फोडण्याच्या प्रयत्न करणा-या फरार आरोपी अटकेत

  ऑगस्ट सकाळी फिर्यादी राजू बुरडे बँकेचे मॅनेजर यांना एटीएम फोडण्याचा प्रकार दिसला त्यातील 59,411 रोख रुपये बरोबर दिसले त्यांनी घुग्घुस पोलिसात तक्रार दिली तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध कलम 379,511 गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे पथकाने सिसिटीव्ही कॅमेरा चेक करून कपड्याच्या लाल रंगा वरून व हातातील तीन कड्यावरून आरोपी मुनीराज परमेश मंचीनिल्ला (23) रा. नकोडा दिनांक 21 ऑगस्ट रोजी यास अटक केली.
  ही कारवाई पो. नि. राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे, मनोज धकाते, महेश मांढरे, महेंद्र वन्नकवार, सचिन डोहे, रवी वाभिटकर यांनी केली.
  काही दिवसापूर्वी जुना बस स्टॅन्ड जवळील बँक ऑफ इंडियाचे एटीएमच्या काचा फोडण्यात आला.
  तोच ही दुसरी घटना घडली आहे जेव्हा पासून दारू बंदी हटल्याने गुन्हेगारीच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे.गुन्हेगारीवर आळा घालावा अशी नागरिकांची मागणी आहे.