• Advertisement
 • Contact
More

  ओबीसींच्या मोर्चासाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

  (प्रतिनीधी -: पवन झबाडे )

  जाती निहाय जनगणनेची प्रमुख मागणी घेवून ओबीसी जनगणना समन्वय समितीच्यावतीन चंद्रपुरात विशाल मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाच्या निमित्ताने पोलिस प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा आज बुधवारला घेतला.  मोर्चाची सुरवात दीक्षाभूमी येथून होईल. शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा निघेल आणि समारोप चांदा क्लब मैदानावर होईल. मोर्चात नेमकी की संख्या राहील, याबाबत सारेच अनिभिज्ञ आहे. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडून नये, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी मोर्चाच्या मार्गाची पाहणी केली.  शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सहा पोलिस उपविभागीय अधिकारी,  जिल्हातील विविध ठाण्यातील पोलिस निरीक्षक आणि हजारो पोलिसांची फ़ौज मोर्चासाठी तैनात करण्यात केली.
  दरम्यान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत सकाळी सात ते सायंकाळी सात यावेळात बदल करण्यात आला आहे. बसस्थानक ते कस्तुरबा चौक आणि गांधी चौक ते प्रियदर्शनी चौकातील वाहतूक बंद राहील. सोबतच वरोरा नाका मार्गे संतकवलरम चौकातून दवा बाजार मार्गे जटपुरा गेटपर्यंत येणा-या वाहनांवरही बंदी घालण्यात आली आहे.
  नागपूर मार्गे बल्लारपूर, मूलकडे जाणारी सर्व प्रकारची वाहन वरोरा नाका उड्डाण पुलावरून सावरकर चौक ते बंगाली कॅम्प मार्गे जातील. या दोन्ही येणारी वाहने याच मार्गाने नागपूर मार्गे जातील. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवाशांनी नागपूर,वणी, घुग्घुस, गडचांदूरकडे जाणा-या येणा-या प्रवाशांना रहमत नगर, नगीना बाग, दाताळा मार्गाचा पर्याय खुला राहील. बल्लारपूर व मूलकडून येणारी वाहनांना शहरात यायचे असल्यास बसस्थानक चौक, एलआयसी आफिस, बगड खिडकी मार्गे किंवा जुनोना चौकातून शहरामध्ये प्रसन्ना पेट्रोल पंपकडून बाबुपेठ मार्गे शहरात फक्त अंचलेश्वर गेटपर्यंत प्रवेश करता येईल.