• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    ओबीसींना वैद्यकीय शिक्षणात आता २७ टक्के आरक्षण , सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालकमंत्री वडेट्टीवारांनी केले स्वागत

    ओबीसींना वैद्यकीय शिक्षणात २७ टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी विविध संघटनांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. मात्र, केंद्र सरकारकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते. अखेर, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना वैद्यकीय शिक्षणात २७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओबीसी समाजातील युवकांना आता डॉक्टर होण्याची संधी उपलब्ध होणार असल्याची प्रतिक्रिया ओबीसी नेते तथा राज्याचे बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या ३४० कलमान्वये ओबीसींना आरक्षण दिले आहे. त्यानुसार वैद्यकीय शिक्षणात ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळणे अपेक्षित होते. मात्र, केंद्र सरकारच्या अनास्थेमुळे ओबीसी समाजातील तरुणांना आरक्षणानापासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे अनेक संघटनानी वैद्यकीय शिक्षणात ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली होती. मोदी यांच्या रूपाने ओबीसी पंतप्रधान देशाला मिळाले. मोदी यांच्याकडून समाजाला अनेक अपेक्षा होत्या. मात्र, मोदी यांनी ओबीसी समाजाचा भ्रमनिरास केला. अखेर यात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करीत ओबीसींना वैद्यकीय शिक्षणात २७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय ओबीसी समाजाला न्याय, हक्क देणारा आणि घटनेची तरतूद लागू करणारा असल्याचे वडेट्टीवार म्हणाले