• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  कृत्रिम पद्धतीने झाला अजगराच्या पिल्लांचा जन्म

  शेताच्या पाळीवर अजगरासह अंडी असल्याची माहिती वासुदेव चौखुंडे या शेतकऱ्याने येथील संजीवन पर्यावरण संस्थेला दिली. संस्थेचे अध्यक्ष उमेषसिंह झिरे यांनी शेतात जाऊन अजगराला पकडून जंगलात निसर्गमुक्त केले आणि अंड्यांतून कृत्रिम पद्धतीने चार पिल्लांना जन्म दिला. अजगराच्या सर्व पिल्लानाही बुधवारी निसर्गमुक्त केले. कृत्रिम पद्धतीने अजगराच्या पिल्लांना जन्म
  दिल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.
  चिचपल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत अंतरगाव पारडवाही येथील वासुदेव गजानन चौखुंडे यांच्या शेतात एक अजगर आपल्या अंड्यांसोबत होता. ही माहिती क्षेत्र सहाय्यक प्रशांत खनके व वनरक्षक सुभाष मरसकोल्हे यांना देण्यात आली. वनकर्मचारी व संजीवन संस्थेच्या सदस्यांनी चौखुंडे यांना अजगराला अंडयातून पिल्ले निघेपर्यंत तिथेच राहू देण्याची विनंती केली; पण भीतीपोटी त्यांनी अजगराला शेतात
  राहू देण्यास असमर्थता दर्शवली. घटनेची माहिती चंद्रपूर वनविभागाच्या विभागीय वनाधिकारी सारिका जगताप साहाय्यक वनसंरक्षक श्रीनिवास लखमावाड व विचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी  यांच्या उपस्थितीत संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्यांनी
  कृत्रिम पद्धतीने जन्म दिलेले हेच ते अजगराचे पिल्ले.
  यांनी अजगराला सुरक्षितपणे पकडले अजगराला वनकर्मचारी व संजीवन व अजगराची अंडी ताब्यात घेतली. पर्यावरण संस्थेच्या सदस्यांच्या
  उपस्थितीत सुरक्षितपणे कक्ष क्रमांक ७५१ मध्ये निसर्गमुक्त केले.
  उबवून पिल्ले निघण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. अजगराच्या चारही पिल्लांना वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ५२२ येथील नाल्याशेजारी सुरक्षितपणे सोडण्यात आले