• Advertisement
 • Contact
More

  कृषि ग्राहकांसाठी, चक्क डोंग्‍यातून वाहून आणली वीज

  चंद्रपूर परिमंडळातील  बल्लारशा विभाग अंतर्गत  पोंभुर्णा तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेले टोक  गावातील ०२ कृषिपंप ग्राहकांचे कनेक्शन असलेल्या रोहित्रामध्ये नुकताच बिघाड झाल्याने त्या ग्राहकांचा विजपुरवठा खंडित झाला.

  त्यानंतर शांताबाई किसन दायले  व टेकलू नारायण कस्तुरे या दोन्ही ग्राहकांनी आपले थकीत विजबिल एकूण  रक्कम ११७३०  महावितरण उपविभाग कार्यालय

  पोंभुर्णा येथे येऊन भरले. विशेष म्हणजे या दोघांना नवीन कृषि पंप वीज जोडणी धोरण 2020 चा लाभ मिळाला व ते पूर्णपणे थकबाकी मुक्त झाले. सहाय्यक अभियंता कुणाल पाटील यांनी त्यांना  नवीन कृषि पंप वीज जोडणी धोरण 2020 चे  महत्व व लाभ समजावून सांगितले.

  महावितरण पोंभूर्णा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता कुणाल पाटील   यांनी लगेच पाउले उचलत रोहित्राची जुळवाजुळव करून सदर रोहित्र वीजकर्मचारी   संतोष वाढई   व  राऊत यांच्या मदतीने  बदलविले. सदर बिघाड झालेला रोहित्र

  बदलविण्यासाठी त्याठिकाणी जाण्यास कोणताही रस्ता नसल्याने व पोंभूर्णा ते जुनगाव असा ३० किलोमीटरचा कच्च्या रस्त्याचा खडतर  मार्ग असल्याने शेवटी दुथडी वाहणाऱ्या  वैनगंगा नदीच्या पात्रातून डोंग्यामधून मेसर्स धकाते इलेक्ट्रिकलस कंत्राटदारांचे मजूर व महावितरणच्या कर्मचारयांचे मदतीने  नवीन २५ के.व्ही.ए. क्षमतेचे रोहित्र डोंग्यामधून वाहून नेउन बिघडलेले रोहित्र तातडीने बदलविण्यात आले. व अशाप्रकारे विजपुरवठा खंडित  झालेल्या दोन्ही कृषिपंप ग्राहकांचा विजपुरवठा पूर्वरत सुरू होऊन त्यांना आपल्या शेतीच्या धान रोवणीच्या कामास मदत झाली व त्यांनी महावितरण प्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या या कामाचे निश्चितच मुख्य अभियंता  सुनिल देशपांडे यांनी व अधिक्षक अभियंत्या श्रीमती. संध्या चिवंडे यांनी केले आहे.