• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    के.के.सिंग यांच्या उपोषणाची सांगता,

    चंद्रपूर वेकोलि प्रबंधनाच्या विरोधात इंटकचे राष्ट्रीय संघटनमंत्री के. के. सिंग यांनी मागील सहा दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. मात्र, वेकोलि व्यवस्थापनाकडून कोणतीही दखल घेतली जात नव्हती. खासदार बाळू धानोरकर यांनी उपोषण मंडपाला भेट देत वेकोलि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अखेर वेकोलि अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर के. के. सिंग यांच्या आंदोलनाची सांगता झाली. कामगारांच्या मागण्या दिलेल्या कालावधीत पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी खासदार धानोरकर यांनी वेकोलिला दिला. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार देवराव भांडेकर, विनोद दत्तात्रय, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी विनोद दत्तात्रय, घनश्याम मुलचंदानी, कुणाल चहारे,  , दुर्गेश कोडाम, राजेश रेवल्लीवार, राजेश अडूर आदी उपस्थित होते.