• Advertisement
  • Contact
More

    कोरपना तालुक्यातील मांडवा सावलहिरातून सागवन जप्त
    तिघांवर गुन्हे दाखल; वनविभागाच्या भरारी पथकाची कारवाई

    कोरपना तालुक्यातील मांडवा, सावलहिरा या गावातून वनविभागाच्या भरारी पथकाने ५० हजार रुपयांचे अवैध सागवन जप्त केले. याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सोफासेट, दिवाण यासह अन्य साहित्य तयार करण्यासाठी जंगलातून गेल्या काही महिन्यांपासू सागवनाची चोरी सुरू होती. याची कुणकुण लागल्याने वनविभागाने पाळत ठेवून ही कारवाई केली.कोरपना उपवनक्षेत्रातील काही जण घरगुती साहित्य तयार करण्यासाठी जंगलातून सागवनाची कटाई करीत असल्याची माहिती मध्य चांदा वन विभागाचे संरक्षण, अतिक्रमण निर्मूलन या भरारी पथकाला मिळाली. याच माहितीच्या आधारे भरारी पथकाचे वन परिक्षेत्र अधिकारी विनायक नरखेडकर यांनी मांडवा येथील सुरेश गणपत क्षीरसागर यांच्या घरी छापा टाकला. तेव्हा सोफासेट, दिवाण, पलंगाचे लाकडे आढळून आले. हे साहित्य भरारी पथकाने जप्त केले. त्याची किमत २४ हजार ५५५ रुपये आहे. याप्रकरणी सुरेश क्षीरसागर
    याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सावलहिरा येथील दिवाकर हंसकर, मारोती हंसकर यांच्या घरी छापा टाकला. त्याच्या घरातून फर्निचरसाठी अवैधरित्या आणलेले सागवान लाकूड जप्त करण्यात आले. याप्रकरणी दिवाकर हंसकर, मारोती हंसकर यांच्याविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.