• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची जबाबदारी घेनार १५ अधिकारी

    कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील ३२५ बालकांनी आई वडील या दोघांपैकी एक तसेच सात बालकांनी दोन्ही पालकांना गमावले आहे. डोक्यावरील छत्र हरविल्यामुळे या बालकांची वाताहत होऊ नये यासाठी शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात १५ पालक अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. हे पालक अधिकारी बालकांचे संरक्षण, त्यांचे अधिकार आणि न्याय मिळवून देणार आहे.
    जिल्ह्यात कोरोनामुळे १ हजार ५३३ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ३२५ च्या वर बालकांनी आई-वडील यापैकी एकाला गमावले आहे. बालकांच्या आईवडिलांच्या नावाने असलेल्या संपत्तीकडे दुसऱ्यांचे लक्ष जाण्याची तसेच शासनाच्या योजनांद्वारे मिळणाऱ्या लाभापासून ते वंचित राहण्याची शक्यता आहे. यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन केली असून या समितीवर लक्ष ठेवण्यासाठी १५ अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. हे अधिकारी बालकांची जबाबदारी घेणार आहे.