• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    खासदार बाळू धानोरकर यांचा मार्गदर्शनात बाबुपेठ येथील शेकडो भाजप कार्यकर्त्यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश

    राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाली तेव्हापासून सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थाने सन्मान मिळत आहे. समाजातील शेवटच्या वर्गापर्यंत विकास पोहोचत आहे. राज्य शासनाच्या निर्णयाचा  या कोरोना काळात मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. त्यामुळेच समाजातील विविध पक्षातील युवक हे काँग्रेसमध्ये येत आहे. काल दिनांक १७ जुलै रोजी बाबुपेठ येथील बजरंग मैदान बायपास रोड येथे शेकडो युवकांनी काँग्रेमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यावेळी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत आशा वर्कर व सफाई कामगार  यांचा कोरोना योद्धयांच्या सत्कार देखील करण्यात आला                                    यावेळी माजी आमदार देवराव भांडेकर, काँग्रेस चंद्रपूर शहर अध्यक्ष रामू तिवारी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती अनुताई दहेगावकर, अश्विनी  खोब्रागडे, इंटक अध्यक्ष प्रशांत भारती, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, कुणाल चहारे, पप्पू सिद्धीकी  यांची उपस्थिती होती.