• Advertisement
  • Contact
More

    घुग्गुसच्या अमराईत मगरीचे वास्तव्य , नागरिकांत भीतीचे वातावरण

    घुग्गुस शहरातील अमराई रस्त्यावर मगर दिसून आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
    काल रात्रीच्या सुमारास घुग्गुस शहरातील छोटी अमराई कडे काही वाहनधारक जात होते. अशातच या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना रत्यावर मगर दिसली.त्यानंतर वेकोलीच्या सिएचपी बंकर जवळ असलेल्या छोट्या तलावात या मगरीने उडी टाकली. त्यामुळे ही मगर सध्या या तलावात असून स्थानिक मच्छीमार येथे जाण्यास भीत आहेत.
    या रस्त्यावरुन पादचारी,दुचाकी वाहनांची सतत वर्दळ असते.तर आता येथे मगर आढळून आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तेव्हा संबंधित मगरीला वनविभागाने पकडून तिला सुरक्षित ठिकाणी सोडावे अशी मागणी नागरिकांतून जोर धरु लागली आहे.