• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    घुग्घुस नगरपरीषदेच्या गोदामाला आग जुने दस्ताऐवज जळून खाक, तहसीलदार निलेश गौड यांनी केली पाहणी

    आज बुधवारी सकाळच्या सुमारास घुग्घुस नगर परिषदेच्या गोदामाला अचानक आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या,व आगीवर नियंत्रण मिळवले. याची माहिती तहसीलदार निलेश गौड व मुख्याधिकारी आर्शिया जुही यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. दरम्यान आग लागलेल्या खोलीत घुग्गुस ग्रामपंचायत चे काही जुने दस्ताऐवज जळून खाक झाल्याची माहिती तहसीलदार निलेश गौड यांनी दिली आहे.ही आग शॉर्ट सर्किट ने लागल्याचा अंदाज वर्तविला जात असून याची चौकशी करण्याबाबत घुग्गुस पोलिसांना पत्र देण्यात येणार आहे. त्यानंतरच आगीचे नेमके कारण कळू शकणार असल्याची माहिती तहसीलदार गौड यांनी दिली.