• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  घुग्घुस येथिल गुंडप्रवृत्तीच्या युवकांनी बँक ऑफ इंडियाच्या एटीएमचा काच फोडल्या

  सोमवार 16 ऑगस्ट रोजी रात्री दरम्यान जुना बसस्थानक जवळ बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे हे एटीएम घुग्घुस शहरातील गुंडप्रवृत्तीच्या युवकांनी फोडले.
  काही गुंडप्रवृत्तीचे युवक येथे पैसे काढण्यासाठी गेले परंतु या एटीएम मधून पैसे निघाले नाही म्हणून याठिकाणी हौदोस घालून एटीएमच्या काचा फोडल्या व येथून फरार झाले.
  परंतु याची तक्रार पोलिसात होणार या भीतीने दुसऱ्या दिवशी सकाळी काही गुंडप्रवृत्तीच्या युवकांच्या वडीलधाऱ्यांनी बँकेच्या प्रबंधकाची भेट घेऊन क्षमायाचना केली व नवीन काच लावून देण्याची हमी दिली व या एटीएमला काच लावण्यात आला.
  जिल्ह्यातून दारू बंदी उठताच सध्या शहरात दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत गुंडप्रवृत्तीचे युवक हौदोस घालत आहे.