• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    घोरपडीची  शिकार भोवली, दोघांना अटक – १४ दिवसाचा न्यायालयीन कोठडी

    चंद्रपुर वनपरिक्षेत्रातील दुर्गापुर नियतक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सिटीपीएस परिसरात घोरपडीची शिकार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. राजु सिताराम नागपुरे, बंडु मधुकर नरुले अशी अटकेतील व्यक्तींची नवे आहेत. त्यांच्याविरुद्व वन्यजीव संरक्षण अधिनियम कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सिटीपीएस परिसरात घोरपडीची शिकार केली जात असल्याची माहिती वनविभाच्या कर्मचाऱ्यांची मिळाली. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून राजु नागपुरे, बंडु नरुले या दोघांना ताब्यात घेतले. दोघांच्या आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.सदर कारवाई विभागीय वनाधिकारी सारिका जगताप, सहायक वनसंरक्षकएस.एल. लखमावाड यांचा मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी आर.ए. कारेकर, क्षेत्रसहायक  तावाडे,  वनपाल डांगरे, दहेगावकर यांच्या पथकाने केली आहे.