• Advertisement
  • Contact
More

    चंद्रपुरातात कोरोनाची पुन्हा ऐन्ट्री , १६ दिवसांनंतर पॉझिटिव्ह, रुग्ण कोविड रुग्णालयात दाखल

    चंद्रपूर जिल्ह्यात गेले 16 दिवस कोरोनाचा एकही रुग्ण
    नव्हता. आता वृद्ध महिला पॉझिटिव्ह  सापडली. ती महिला बल्लारपूर तालुक्यातील रहिवासी आहे. संबंधित महिलेच्या घरी वृद्ध पती-पत्नी वास्तव्याला आहेत. कोरोनाबाधित असल्याची पुष्टी. झाल्या नंतर महिलेला जिल्हा रुग्णालय  परिसरातील कोविड उपचार इस्पितळात दाखल केले. महिलेच्या नमुन्यातील कोरोनाच्या नेमक्या व्हेरियंटबाबत माहिती घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा पाठपुरावा करीत आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. देशात काही ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे. अशात हा रुग्ण सापडला असल्यानं चंद्रपूर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलंय.