• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    चंद्रपुरातील चार बिल्डर्स शासनाच्या काळ्या यादीत

    महाराष्ट्रातील रिअल इस्टेट (रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट) अधिनियम, २०१६ अंतर्गत प्राधिकरण, महारेरा यांनी राज्यातील काही गृहनिर्माण प्रकल्प मुदतीत पूर्ण न केल्यामुळे काळ्या यादीत टाकले आहेत. प्राधिकरणाने त्यांना राज्यात विक्री, जाहिरात किंवा मार्केटिंग करण्यास प्रतिबंध घातला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील चार बिल्डर्सचा (विकासक) यामध्ये समावेश आहे.
    महारेराकडे नोंदणी करताना प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत नमूद करावी लागते. त्या तारखेत ते प्रकल्प पूर्ण
    करून संबंधित ग्राहकांना विकता येतो. मात्र, राज्यभरातील काही विकासकांनी मुदत संपूनही संबंधित प्रकल्प पूर्ण केले नाहीत. त्यामुळे अनेकांना महारेरा काळ्या यादीत टाकले आहे. याबाबत संबंधित विकासकांच्या म्हणण्यानुसार, आम्ही महारेराच्या नियमानुसार वेळेत प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. यासंदर्भातील सर्व कागदपत्रेही ग्राहकांकडे सुपुर्द केली आहेत. ही यादी महारेराच्या नियमानुसार प्रकल्प पूर्ण न करणाऱ्यांना लागू पडते. ही यादी राज्य शासनाच्याhttps://maharera.ma haonline.gov.in/Site/1128/Lap sed Projects या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.