• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  चंद्रपुरात ३७ लाखांची चोरी
  ७० तोळे सोने, १५ लाख रोख लंपास
  आरोपी फरार, रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल,

  घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण तब्बल ३७ लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना शहरातील तुकूम परिसरातील प्रकाश जैस्वाल यांच्या घरी गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
  येथील शिवाजीनगरात प्रकाश जयस्वाल यांच्या घरातील सर्व सदस्य रात्री दुसऱ्या घरी गेले होते. रात्री एकही सदस्य घरी आला नाही. घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील ७० तोळे सोन्याचे दागिने, १५ लाख रुपये रोख लंपास केली.
  याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीचा शोध सुरु आहे.