• Advertisement
 • Contact
More

  चंद्रपूरची वाळू तेलंगणात ,
  गोंडपिपरी तालुक्यातील
  चक लिखीतवाडातुन वाळू तस्करी

  चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी असताना तळीरामांची तहान लगतच्या तेलगंनातून भागविली जात होती. आता तेलंगनात उत्खननावर निर्बंध आल्यानंतर गोंडपिपरी तालुक्यातील चक लिखीतवाडा येथुन तस्कर तेलंगनात वाळूचा पुरवठा करीत आहे. तिथे वाळूचे दर अधिक असल्याने अधिकाऱ्यांना हाताशी पकडून हा वाळूचा तस्करीचा खेळ सुरु आहे. 
  सध्या वाळू घाटांना जिल्ह्यात परवानगी मिळाली आहे. त्यामुळे वाळूचे दर घसरले. घाटात गुंतविलेले कोट्यवधी रुपये निघणार नाही, अशी भिती या व्यवयासातील लोकांना वाटत आहे. त्यामुळे आता त्यांनी लगतच्या तेलंगनावर लक्ष केंद्रीत केले आहे. गोडपिपरी तालुक्याची सीमा तेलगंना लागून आहे. दारुबंदीत याच मार्गाने जिल्ह्यात दारुचा पुरवठा व्हायचा. तेलगंनात वाळू उत्खननावर बरेच निर्बंध आले आहे. त्यामुळे तिथे वाळूचे दर भडकले. त्यामुळे आता चंद्रपूर जिल्हयातील वाळु तस्करांनी तेलगंनात वाळू पुरवठा सुरु केला आहे. तिथल्या तस्करांशी संधान साधून रात्र दिवस वाळू पाठविली जात आहे. राज्याच्या सीमा ओलांडून वाळू तस्करीची ही पहिलीच वेळ आहे. यात संबंधित तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांना या तस्करांनी हाताशी घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे या गोंडपिपरी चेक लिखीतवाडा तालुक्यातील घाटांवर नियमबाह्य रित्या रात्र दिवस मशीन्स लावून वाळूचा उपसा सुरु आहे. मात्र याकडे अद्याप प्रशासनाचे लक्ष गेले नाही. सर्वपक्षीय कार्यकर्ते आता वाळूच्या व्यवसायात उतरले आहे. त्यामुळे नेत्यांचा प्रशासनावर दबाब आहे. त्यामुळे अधिकारीही कारवाईसाठी धजावत नाही. तेलगंनाच्या तस्करांनीही तिथली यंत्रणा हाताशी पकडली आहे. त्यामुळे दोन्ही कडून वाळू तस्करीचा मार्ग मोकळा झाला आहे.