• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    चंद्रपूरातील जीर्ण इमारतीचा मालकांना मनपाची नोटीस – तिन दिवसात निर्णय न घेतल्यास होणार कारवाई

    पावसाळ्याच्या दिवसांत जीर्ण इमारतींमुळे जीवित आणि वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील ९९ जीर्ण इमारतीच्या मालकांना महानगर पालिका प्रशासनाने नोटीस बजावून इमारती पाडा अन्यथा मनपाकडून पडण्याची कारवाई केली जाणार असल्याचे कळविले आहे. चंद्रपूर शहरात अनेक जुन्या इमारती आहेत. या इमारती कधीही कोसळू शकतात. या घटनेतून जीवित आणि वित्त हानी होण्याची शक्यता असते. सध्या पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे चंद्रपूर महानगर पालिका प्रशासनाने झोन क्रमांक १ मध्ये ४२, झोन क्रमांक २ मध्ये ३५ आणि झोन क्रमांक ३ मध्ये २२ अशा एकूण ९९ जीर्ण इमारतीच्या मालकांना नोटीस पाठवून इमारत पाडण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा मनपाकडून पडण्याची कारवाई केली जाईल, असे नोटीसमध्ये कळविले आहे.
    शहरातील अती जीर्ण असलेल्या इमारती लवकरात लवकर खाली कराव्या, अन्यथा मनपा येत्या चार पाच दिवसात इमारती खाली करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे उपायुक्त विशाल वाघ यांनी सांगितले आहे.