• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  चंद्रपूर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९९.१० घोषीत
  अंतर्गत मूल्यांकनाचा आधारे निकाल जाहिर

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रथमच इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. दरम्यान, विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक सोयीच्या दृष्टीने अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे IT दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा ९९.१० टक्के निकाल घोषीत करण्यात आला आहे.
  शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन तसेच वर्षभरातील व आधीच्या वर्षाच्या कामगिरीच्या आधारे हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्याथ्र्यांची ऐच्छीक सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील २८ हजार ८२१ नियमित विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. तर १३०४ णि पुर्नपरिक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. नियमित विद्याथ्यापैकी ५,६४४ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, १४,०५४ विद्यार्थी श्रेणी १ मध्ये, ८,६०४ विद्यार्थी श्रेणी २ मध्ये तर ४१६ विद्यार्थी पास या श्रेणीत उतीर्ण असे एकुण २८,७१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. तर पुर्नपरिक्षार्थ्या १३०४ विद्यार्थ्यांपैकी १ विद्यार्थी प्रावीण्यश्रेणीत, १६ विद्यार्थी श्रेणी १ मध्ये, ६९ विद्यार्थी श्रेणी २ मध्ये तर १०५१ विद्यार्थी पास श्रेणी असे एकुण ११३७ विद्यार्थी उत्तीर्ण
  झाले आहे.