• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  चंद्रपूर जिल्ह्यात डेंग्यू ने चिंता वाढविली
  पंधरा दिवसांत आढळले २२ रुग्ण

  कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आरोग्ययंत्रणा आणि नागरिक आता कुठे मोकळा श्वास घेत असताना ‘डेंग्यू ‘ने चिंता वाढविल्याचे दिसू लागले आहे. मिळालेल्या माहिती नुसार गेल्या पंधरा दिवसात ‘डेंग्यू’चे २२ रुग्ण आढळून आले आहे.
  खासगी रुग्णालयातील डेंग्यूची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महानगरपालिका प्रशासनाकडेही उपलब्ध नाही. ही आकडेवारी पाहता डेंग्यूने भीती वाढविल्याचे दिसत आहे.
  तिसऱ्या लाटेला थोपविण्याची तयारी सुरू असताना आता ‘डेंग्यू’ने डोकेवर काढले आहे. गेल्या पंधरा दिवसात  सर्वांचे लक्ष कोरोनाचा तिस-या लाटेकडे होते मात्र ‘डेंग्यू’चे २२ रुग्ण पाहता आता कोरोना सोबतच डेंग्यूचेही संकट डोक्यावर असल्याचे दिसुन येत आहे