• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    चंद्रपूर जिल्ह्यात डेल्टा प्लसची ऐन्ट्री
    जिल्हा प्रशासन झाले सतर्क
    पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते रक्ताचे नमुने

    भद्रावती शहरात डेल्टा प्लसचा एक रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नगर परिषद सभागृहात तातडीची आढावा बैठक
    शहरातील फुलेनगर सुमठाणा येथील ४० वर्षीय महिलेला एका महिन्यापूर्वी कोरोना झाला होता. या महिलेचे रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तब्बल एक महिन्यानंतर रक्ताचा अहवाल डेल्टा प्लस आढळून
    आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. या महिलेची प्रकृती ठणठणीत आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नगर परिषद सभागृह, भद्रावती येथे तातडीची बैठक बोलावली. यावेळी उपविभागीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तहसीलदार महेश शितोळे. मनीष सिंग, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर आदी उपस्थित होते. या रुग्णाची प्रकृती ठणठणीत असली तरी या परिसरात कॅम्प लावून नागरिकांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी
    काळजी घेण्याचे गरज असल्याचे डॉ. मनीष सिंग यांनी  सांगितले. डेल्टा प्लसचा रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेल्टा प्लस व्हेरिट हा करण्याजोगा असल्याचे जाहीर केले. मात्र, या व्हेरियंटमुळे तिसरी लाट येऊ शकते हे सांगणारी कोणतीही आकडेवारी अजून उपलब्ध नाही, अशी माहिती एका वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यात लस घेणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.