• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    चंद्रपूर तापले @ 45.4, राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद

    राज्यभरातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून चंद्रपूर शहराची ओळख आहे. चंद्रपूर शहरात मनपा उष्माघातविरोधी आराखडा राबवत आहे. शहर मनपा हद्दीत उष्माघातापासून नागरिकांना बचावासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत. शहरातील मनपा व जिल्हा रुग्णालयातील वॉर्डात रुग्णांसाठी कोल्ड वॉर्ड तयार केले गेले आहेत. दुपारच्या वेळेस अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन मनपाने केले आहे. शहरातील पार्क- बागांमध्ये दुपारच्या सुमारास विसाव्यासाठी मोकळीक दिली गेली आहे. शहरातील विविध भागात व चौकांमध्ये थंड पाण्याची सुविधा करण्यात आली आहे. महाकाली यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेत स्प्रिंकलर्सची सोय करण्यात आली. यामुळं काहिलीपासून दिलासा दिला जात आहे. चंद्रपूर शहरातील तापमान राज्यातील सर्वाधिक 45.4 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. म्हणूनच सातत्याने वाढणाऱ्या तापमानाचा मुकाबला करण्यासाठी मनपा प्रशासन  सज्ज झाले आहे