• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  चंद्रपूर बाजार समितीचे तीन संचालक बडतर्फ जिल्हा उपनिबंधकांचा आदेश

  कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरचे संचालक सुनील फरकाडे, विजय टोंगे, नामदेव जुनघरे यांना जिल्हा उपनिबंधक डी. यू. शेकोकार यांनी पदावरून बडतर्फ केले. यापूर्वी सभापती रणजित डवरे व एका संचालकाला पदावरून निष्काषित केले होते.
  चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार •समितीमधून सूनील फरकाडे हे ग्राम पंचायत मतदार संघ, विजय मारोती टोंगे हे सेवा सहकारी संस्था तर नामदेव जुनधरे ग्रामपंचायत मतदार संघातून निवडून आले होते. हे तीनही संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ज्या मतदार संघातून निवडून आले होते. त्या
  मतदार संघाचे ते सदस्य नाहीत, अशी तक्रार जिल्हा उपनिबंधकाकडे करण्यात आली. हे संचालक महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री ( विकास विनियम) अधिनियम १९६३ चे कलम १५ (१) च्या तरतुदीनुसार संचालक म्हणून राहण्यास अपात्र असल्याची तक्रार आल्यानंतर याबाबत २ ते २२ जून २०२१ दरम्यान जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सुनावणी झाली.
  यावेळी महाराष्ट्र खरेदी विक्री अधिनियमअंतर्गत मतदार संघाचे सदस्य असल्याबाबत पुरावे सादर करू शकले नाही. यावरून जिल्हा उपनिबंधक डी. यू. शेकोकार यांनी तिघांनी संचालक पदावरून बडतर्फ केले.