• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात सुरक्षेसाठी ४०० जवान तैनाती

    चंद्रपूर  महाऔष्णिक वीज केंद्रात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या मदतीला आता महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय सुरक्षा दलाचे २५० व महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १५० असे एकूण ४०० सुरक्षा जवान वीज केंद्राच्या सुरक्षेत तैनात करण्यात आले आहेत.
    चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात मोठ्या प्रमाणात भंगार चोरीची प्रकरणे यापूर्वी समोर आली आहे. तसेच
    २९२० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेल्या या केंद्रात यापूर्वी अनेकदा कोळसा चोरी सोबतच इतरही चोऱ्यांची प्रकरणे समोर आली आहे. काही भंगार चोरट्यांनी गोळीबार केल्याची घटनाही येथे झाली होती. तसेच मोठ्या घटना होऊ नये यासाठी येथे ४०० जवान तैनात करण्यात आले. येणाऱ्या जाणाऱ्यांची तपासणी करण्यापासून तर वीज केंद्राची संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलावर आहे