• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    चंद्रपूर महापालिकेच्या स्थायी समितीतून आठ नगरसेवक निवृत्त
    महापालिकेच्या आमसभेत होणार नविन सदस्यांची नावे जाहिर

    चंद्रपूर महानगरपालिकेच्या आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपाचे विद्यमान सभापती रवी आसवानी यांच्यासह आठ सदस्य स्थायी समितीतून निवृत्त झाले यामुळे आसवानी यांचे सभापती पद कायम ठेवण्याचे स्वप्न भंग पावले आहे.
    महापालिकेची स्थायी समितीची सभा सभापती रवी आसवानी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पध्दतीने पार पडली. या सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजूरी प्रदान केली गेली. तसेच स्थायी समितीतील एकूण सोळा सदस्यांपैकी आठ सदस्य निवृत्त झाले. यामध्ये भाजपाचे विद्यमान स्थायी समिती सभापती रवी आसवानी, नगरसेवक संजय कंचर्लावार, सुभाष कासनगोट्टूवार, कॉग्रेसचे सकिना अन्सारी, विना खनके, निलेश खोब्रागडे, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या मंगला आखरे तथा बसपाचे प्रदीप डे यांचा समावेश आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महापालिकेची आमसभा होणार आहे. या आमसभेत स्थायी समितीच्या नविन आठ सदस्यांची नावे भाजप, कॉग्रेस, बसपा व नगरविकास आघाडी कडून दिली जाणार आहे