
चंद्रपूर शहरालगत शक्तिनगर वेकोली वसाहतीत बिबट्याचा संचार बघायला मिळाला आहे. रात्रीच्या सुमारास शक्तिनगर मारुती मंदिर परिसरातील घरांसमोर बिबट्याचा आरामात वावरत असल्याचे दृश्य पुढे आले आहे. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या कैद झाला आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र- दुर्गापूर घनदाट वस्ती व शक्तिनगर भागातून गेल्या काही महिन्यात वनविभागाने 1 वाघ व 3 बिबटे जेरबंद केले आहेत. यानंतरही या भागात वाघ- बिबट्यांच्या हल्ल्यात सातत्याने ग्रामस्थांचे मृत्यू होत आहेत. ताज्या सीसीटीव्ही फुटेजमुळे वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड सरकारी कोळसा कंपनीतील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वसाहतीत बिबट्याचा धोकादायक वावर असल्याचे स्पष्ट झाले असून वनविभागाने तातडीने बिबट्या जेरबंद न केल्यास आणखी मोठी घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.