• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी गठीत

    चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीला प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी नुकतीच मंजुरी दिली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी कार्यकारिणीची घोषणा केली आहे.
    पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनात कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत उपाध्यक्ष रवी भिसे प्रसन्ना शिरवार, संगीता अमृतकर, प्रशांत दानव, प्रवीण पडवेकर, दुर्गेश कोडाम, चंद्रमा यादव, राजेश रेवल्लीवार, अश्विनी खोब्रागडे, प्रसन्ना शिरवार, निखिल काच्छेला, मनीष तिवारी, संजय रत्नपारखी, नंदकिशोर लहामगे, विजय धोबे, चंदा वैरागडे, विजय चहारे, पीर मोहम्मद (बापू) अंसारी, अमित (पिंकी) दीक्षित, कोषाध्यक्ष अख्तर (पप्पू) सिद्दीकी, सरचिटणीस गोपाल अमृतकर, राज यादव, जवाहरभाई  पंजाबी, राजू नंदनवार, सुधाकर चन्ने, कल्पना गिरडकर, अजय बल्की, राजू वासेकर, ऍड. विक्रम टंडन, संजय गंपावार, ऍड. प्रीती शहा, मंगेश डांगे, रवी भिसे, इरफान शेख, मनोज खंडेकर, महेंद्र अडूर, सलीम शेख, चिटणीस सुरेश टापरे, स्वप्नील केळझरकर, नागेश बंडेवार, पंकज इटनकर, नीलेश पाउणकर, सैय्यद आसिफ, हाजी अली, गणेश निमकर, प्रसिद्धीप्रमुख सुलतान अश्रफ अली, चेतन दुरसेलवार, कासिफ अली यांची निवड करण्यात आली आहे.
    विशेष निमंत्रित म्हणून माजी आमदार देवराव भांडेकर, विनोदजी दत्तात्रय, संतोषजी लहामगे, श्रीकांतजी चहारे, युसूफभाई  सिद्दीकी, ऍड. विजयजी मोगरे, कृष्णकन्हैया सिंग, डॉ. विश्वास झाडे, बंडोपंत तातावार, अनिता कथडे, तर कायम निमंत्रित म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी मंत्री, जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार, जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार, जिल्ह्यातील प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, जिल्ह्यातील आघाडी संघटनांचे जिल्हाध्यक्ष यांचा समावेश राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिली आहे.