• Advertisement
 • Contact
More

  चंद्रपूर ‘हॉट’ शहर,  पारा ४६.६ अंशांवर

  चंद्रपूर  हा सर्वाधिक  उष्ण जिल्हा म्हणून जगात ओळखला जातो.पंधरा दिवसांपूर्वी यावर्षातील
  सर्वाधिक तापमान ४५.४ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. मात्र, आज शनिवार  चंद्रपूरचे तापमान
  तब्बल  ४६.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आहे.जगातील सर्वात तापमान असलेला जिल्हा म्हणून चंद्रपूरची नोंद करण्यात आली आहे.चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान दरवर्षी वेगवेगळे विक्रम नोंदवित असते.
  जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागतात. यावर्षीच्या उन्हाळ्यात सर्वाधिक
  ४५.५ अंश सेल्सिअस तापमान एप्रिल महिन्यात होते.. आता जाता जाता ३० तारखेला हे तापमान ४६.६
  एवढे झाले आहे. त्यामुळे पुन्हा मे महिना नागरिकांसाठी कठिण जाणार आहे.