• Advertisement
  • Contact
More

    जादूटोण्याच्या संशयावरून संशयावरून बहीण-भाऊ आणि त्यांच्या आईला मारहाण… नागभीड तालुक्यातील मिंडाळा गावातील घटना… 

    अशोक कामठे (४०) आणि यशोदा कामठे (३८) अशी मारहाण झालेल्या बहीण-भावाची नावं असून फिर्यादी असलेल्या आईचे इंदिराबाई कामठे (७०) असं नाव, मारहाण झालेले आणि करणारे सर्व आरोपी मिंडाळा गावातीलच रहिवासी आहेत, अशोक कामठे हा जादूटोणा करतो आणि त्यामुळे मारहाण करणाऱ्या मयुरी सडमाके (२५) हिची तब्येत खराब राहते असा आरोप करत काल दुपारी प्रमोद सडमाके (३५), सीताराम सडमाके (६६), मयुरी सडमाके (२५), पिल्ला आत्राम (२०) आणि चंद्रकला आत्राम (५५) यांनी यशोदा व इंदिराबाई यांना लाथा-बुक्क्यांनी तर अशोक याला बांबू आणि बॅट ने मारहाण केली, या प्रकरणी नागभीड पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे, जिवती तालुक्यातील वणी-खुर्द येथे जादूटोण्याच्या संशयावरून ७ लोकांना मारहाणीची घटना ताजी असतांनाच पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण झाल्याने खळबळ