• Advertisement
  • Contact
More

    जियो फायबरच्या कामाने वीज उपकरणे निकामी – भरपाई द्या अन्यथा काम सुरु करू न देण्याचा नगरसेवक सुरेश पचारे यांचा इशारा

    तुकूम परिसरातील जियो फायबरच्या वतीने केबल टाकण्याचे काम सुरु आहे. या कामादरम्यान वीज तारांनी आग घेत मोठा स्फोट झाला. या प्रकाराने अनेकांच्या घरातील वीज उपकरणे निकामी झाली. यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आले. हि घाटाने शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.
    चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरात जियो फायबरच्या वतीने केबल टाकण्याचे काम सुरु आहे. आज कामादरम्यान कामगारांनी केबल लाईन जोडल्याने तारांमध्ये स्पर्श होऊन मोठा स्फोट झाला. त्यानंतर घरातील सर्व वीज उपकरणे जाळून खाक झाली. यात नागरिकांचे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिओ कंपनीने नुकसान भरपाई द्यावे अन्यथा काम सुरु करू न देण्याचा इशारा नगरसेवक सुरेश पचारे यांनी दिला आहे.