• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    जिल्हयात हिवताप व डेंग्यु आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

    सध्या पावसाळा सुरु असल्यामुळे व सततच्या बदलत्या वातावरणामुळे जिल्हयात डासाच्या वाढीकरीता पोषक वातावरण असून किटकजन्य आजारामध्ये वाढ होत आहे. किटकजन्य आजाराच्या साथीचा उद्रेक प्रभावी सर्वेक्षणाच्या माध्यमातून निश्चित टाळता येऊ शकतो. त्यामुळे हिवताप व डेंग्यू आजरावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवा, अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य विभागाला दिल्या.
    जिल्हयातील सद्यस्थितीत हिवताप व डेंग्यु दुषित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे पूर्व तयारी म्हणून करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणात अति जोखमीचे भाग लक्षात घेऊन त्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.