
चंद्रपूर शहरातील अगदी वर्दळीचे ठिकाण असलेल्या जिल्हा उद्योग भवन परिसरात आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास एक जीवंत अर्भक आढळून आले. त्यामुळे महानगरात खळबळ उडाली आहे. या परिसरात बसस्थानक, रेल्वे स्थानक, जिल्हा सत्र न्यायालय व हाकेच्या अंतरावर असलेले जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, रामनगर पोलिस ठाणे आहे. हा परिसर रात्र-दिवस वर्दळीच्या असतो. अन येथे अर्भक आढळून आल्याने सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला. रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता, अर्भक जीवंत होते. त्याला लागलीच येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. हा अनैतिक संबंधातून घडलेला प्रकार असावा, अशी शक्यता वर्तवली जात असून, याप्रकरणी रामनगर पोलिसांनी अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.