• Advertisement
  • Contact
More

    जिल्ह्यातील ९८ परवानाधारक दारू विक्रेत्यानां दारुविक्रीची परवानगी & मद्यप्रेमींची प्रतिक्षा संपनार, दोन दिवसात प्रत्यक्ष दारु विक्रीला सुरवात

    जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्याच्या घोषणेनंतर मद्यप्रेमी आणि दारूविक्रेते प्रत्यक्षात दारूविक्री कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे. आता उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील 98 दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण प्रक्रिया पूर्ण झाली केली आहे. त्यामुळे ही दुकाने लवकरच ग्राहकांच्या सेवेत दाखल होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे

    उत्पादन शुल्क विभागाने दारूविक्री परवान्यांचे नूतनीकरण प्रक्रिया सुरू केल्यानंतर जिल्ह्यातील अनेकांनी अर्ज केले. अर्जाची पडताळणी केल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने मोक्का चौकशी करीत मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी एक वाईन शाप, 6 बिअर शॉपी, 65 बिअर बार आणि 26 देशी दारू दुकाने यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ही दुकाने लवकर सुरू होतील, अशी मद्यप्रेमींची आशा आहे.

    ReplyForward