
नौशाद शेख -: घुग्घुस
घुग्गुस येथील अमराई वार्डात राहणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे.सुरज माने असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. मात्र मृतकाचे दोन्ही पाय जमिनीला टेकून असल्याने ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सुरज माने हा आपल्या परिवारासोबत अमराई वार्डात राहत होता. त्याला दोन मुले सुद्धा आहे. मात्र अचानक आज सकाळी तो झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला.
याची माहिती परिसरातील नागरिकांनी घुग्गुस पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. व शव झाडाखाली उतरवून शव विच्छेदन साठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठवले.
मात्र मृतकाचे दोन्ही पाय हे जमिनीला टेकून असल्याने ही हत्या आहे? की आत्महत्या याचा पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहेत.