• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    डेंग्यूने घेतला धम्मदीपचा जिव
    नांदाफाटा येथिल घटना

    कोरपना पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक असलेले कालीचरण करमनकर यांचा मुलगा धम्मदीप याचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याने नांदाफाटा येथे खळबळ उडाली आहे. धम्मदीप हा एनआयटीला शेवटच्या वर्षाला असताना एका मोठ्या कंपनीत त्याला नोकरी प्राप्त झाली होती. कोरोनामुळे त्याचे वर्क फ्राम होम सुरू होते. यातच त्याला डेंग्यू आजार झाला. त्याला नागपूर येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला. नांदाफाटा येथे डेंग्यूसदृश्य आजाराने अनेकजण ग्रस्त आहेत. त्यामुळे गावात दहशतयुक्त भीती निर्माण झाली असून, आरोग्य विभागाने शिबिर लावून नागरिकांची तपासणी करावी तसेच गावात डेंग्यू प्रतिबंधात्मक फवारणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.