• Advertisement
 • Contact
More

  तलवारीन हल्ला प्रकरणातील तीन फरार आरोपींना अटक
  बल्लारपुर पोलिसांची कारवाई

  बल्लारपूरातील महाराणा प्रताप वॉर्डातील सुभाष चौकात विशेष ऊर्फ संदीप बोग्गा ऊर्फ सुरेश दवंडेवार यांच्यावर तलवारीने हल्ला करून पळ काढणाऱ्या विशेष ऊर्फ विशू मोगली कोंडावार यास त्वरित अटक केली. परंतु तीन आरोपी फरार होते. त्या तीन आरोपींना बल्लारपूर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अटक केली आहे. घटनेमध्ये वापरण्यात आलेल्या तलवारीचा शोध पोलीस घेत आहेत.
  घटनेमधील गंभीर जखमी यांच्यावर नागपूरला उपचार सुरू आहेत. टेकडी परिसरात महाराणा प्रताप वॉर्डात तलवारी हातात घेऊन यवकांचा
  धिंगाणा करणे नित्याचे झाले आहे. शुक्रवारी जुन्या वैमनस्यामुळे वाद निर्माण होऊन युवकांनी तलवारी हातात घेऊन संदीप बोग्गावर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उमेश पाटील आपल्या चमूसह तत्काळ पोहोच नसते तर वाद चिघळला असता. परिस्थितीवर नियंत्रण करून तत्काळ एकाला अटक केली. फरार आरोपी मोहम्मद रईस मोहम्मद हफीज (२४), चंदू हिबारे (२२), विनोद ऊर्फ चंटी मोगली कोंडावार (२७) यांनाही शनिवारी सायंकाळी अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद रासकर करीत आहेत.