• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    ताडोबा रिसोर्टमध्ये वाघिणीचा तळ
    ताडोबा व्यवस्थापनाचे वाघिणीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू

    ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोहर्ली गावालगत असलेल्या ताडोबा व्हिलेज रिसॉर्टमध्ये एका वाघिणीने प्रवेश करून तळ ठोकला आहे. ताडोबा व्यवस्थापन या वाघिणला सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न करित आहे. दरम्यान आवश्यकता पडल्यास वाघिणीला बेशुध्दीचे इंजेक्शन देवून बाहेर काढण्याची तयारीही सुरू केली आहे.
    ताडोबा व्हिलेज या रिर्सार्टमध्ये वाघिणीने शुक्रवार १३ ऑगस्ट चे सकाळी ६ वाजताच्या सुमारास प्रवेश केल्याचे निर्देशनात आले. स्थानिक लोकांनी रिसोर्टच्या गेट जवळ वाघाला फिरताना बघितले. तसेच रिसॉर्टचा गेट जवळ आतील भागात वाघाचे पगमार्ग आढळून आले. प्राप्त माहितीनुसार मागील अनेक दिवसापासून या परिसरात वाघाचा वावर आहे कधी ईरइ धरण परिसरात तर कधी भांमडेळी गावाच्या रस्त्यावर वाघिणीला लोकांनी बघितले. दरम्यान सकाळच्या सुमारास रिसोर्टमध्ये वाघिण दिसताच ताडोबा व्यवस्थापनाला याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच ताडोबाचे पथक रिसोर्ट परिसरात दाखल झाले. पथक वाघिणीला कुठल्याही प्रकारची हानी न करता रिसोर्ट परिसरातुन बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांचेशी संपर्क साधला असता वाघिणीला बाहेर काढण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान आवश्यकता पडल्यास वाघिणीला बेशुध्द करून बाहेर काढू असेही ते म्हणाले. वाघिण तळ ठोकून असल्याने तेथील सर्व पर्यटक, कर्मचारी यांना बाहेर काढून संपूर्ण रिसोर्ट खाली केले आहे. वाघिण गुरूवारी रात्री पासून ताडोबा व्हॅली रिसोर्ट परिसरात आहे आसपासच्या परिसरात शेती असल्यामुळे जंगली डूक्कर शेतात येतात. त्यांच्या शिकार करण्यास वाघिण पाटलाग करता करता रिसोर्ट मध्ये आला असावा असे म्हटले जात आहे.