• Advertisement
  • Contact
More

    तोतया वनाधिकाऱ्याने केली साडे पंधरा लाखानी फसवणूक

    बल्लारपूर शहरातील एका लाकूड व्यावसायिकाला वनाधिकारी असल्याचे सांगत तब्बल 15.5 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुधाकर जितेंद्र सिंह (वय ३४, रा. बेलथरा, जी. बलिया) असे तोतया वनाधिकाऱ्याचे नाव आहे. तर, लक्ष्मण पटेल असे फसवणूक झालेल्या लाकूड व्यावसायिकाचे नाव आहे. सुधाकर जितेंद्र सिंह याने याने लक्ष्मण पटेल यांची भेट घेऊन मध्यप्रदेशातील हाउमरिया टायगर प्रोजेक्ट येथे सहायक वनाधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले. यावेळी त्याने सागवानाचा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. तसेच मी पाठविलेले सागवान बाजारात विकण्यास सांगितले. त्यानंतर लक्ष्मण पटेल यांनी सुधाकर जितेंद्र सिंह याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत १५ लाख ५० हजार रुपये दिले. परंतु, अनेक महिने लोटूनही सिंह याने सागवानाची लाकडे पाठविली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पटेल यांनी 11 जुलैला बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दिली.
    पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. मात्र, सिंह वारंवार निवास बदलत असल्याने अटक करण्यात अडचणी येत होत्या. उत्तरप्रदेश येथील वाराणसी जिल्ह्यात असल्याची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस स्टेशनमधून पोलीस पथक 16 जुलैला पाठविले. 18 जुलैला पोलिसांनी सिंह याला ताब्यात घेत बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे आणले. त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
    सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपविभागीय अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली