• Advertisement
  • Contact
More

    दारु दुकानांची खैरात
    वाटणाऱ्यांना निलंबित करा
    माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

    कोरोनाच्या जागतिक महामारीत राज्य सरकारने लोकांना दारु पुरविण्याचे काम केले. चंद्रपुरातील दारु याच काळात सुरु झाली. चुकीची माहिती. नकली अहवालाच्या आधारे दारुबंदी उठविण्यात आली. आता तर कोणतीही शहानिशा न करता रहिवासी क्षेत्रात दारु दुकानांना खुलेआम परवानगी दिली जात आहे. याला जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी जबाबदार आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली. जगन्नाथ बाबा नगर आणि वडगाव प्रभागातील रहिवासी क्षेत्रातील दोन दारु दुकान तिथल्या नागरिकांनी बंद पाडली. या दारु दुकानांना दुसरीकडे स्थलांतरीत करा, यासाठी आंदोलन सुरु आहे.या साऱ्या घोळाला जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्क विभागाली अधिकारी जबाबदार आहे, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला. राज्य सरकारने आपल्या अधिकारात चंद्रपूरची दारुबंदी उठविली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने दारु दुकानांची खैरात सुरु केली. रहिवासी क्षेत्रातील नागरिकांना न विचारताच दारु दुकानांना परवानगी दिली जात आहे. शहरात गल्लीबोळात बिअर शॉपी लागल्या आहे. त्यामुळे शहरातील वातावरण खराब होत आहे. याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांनी निलंबित केले पाहिजे, असे मुनगंटीवा म्हणाले.