• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    दारूच्या नशेत केली होटल ची तोडफोड लोहारा सावजी ढाबा य्थिल घटना , रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल , आरोपी फरार

    दारूच्या नशेत असलेल्या युवकाने लोहारा येथील सावजी हॉटेल ची काच फोडल्याची घटना काल सायंकाळ च्या सुमारास घडली असून   रामनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी सध्या फरार आहे.
    चंद्रपूर मूल मार्गावर लोहारा सावजी ढाबा आहे. अशातच काल सायंकाळच्या सुमारास एक युवक येथे दारू पिण्यासाठी आला होता. त्यानंतर तेथे असलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत हॉटल ची काच फोडली. याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी रामनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला तसेच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे