• Advertisement
  • Contact
More

    दारू दुकानासमोर ‘चहा विको’ आंदोलन

    शहरातील देशी दारू दुकानाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. विविध प्रकारचे आंदोलन करूनही प्रशासनाने कोणतीच भूमिका घेतली नसल्याने दत्त नगर येथील दुकानदार दारू दुकान सुरु करण्याचा वारंवार प्रयत्न करीत आहे. त्यामुळे येथील महिलांनी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमूख यांच्या नेतृत्वात दुकानासमोर चहा विकून अनोखे आंदोलन केले.
    नागपूर रोडवरील डॉ. राम भारत यांच्या बालरुग्णालया शेजारी नव्याने सुरू झालेल्या देशी दारू दुकानाच्या विरोधात स्थानिक
    नागरिकांनी सर्वपक्षीय आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये आम आदमी पार्टीनेही उडी घेतली. दरम्यान देशी दारू दुकानदाराने वारंवार दुकान सुरू करण्याचा प्रयत्न केल्याने दत्तनगर व आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी सोमवारी आक्रमक भूमिका घेत सकाळी ८ वाजेपासूनच दुकानासमोर एकत्रीत आल्या. जनविकास सेना महिला आघाडीच्या मनीषा बोबडे व मेघा दखणे यांच्या नेतृत्वात चहा विकून आंदोलन केले.दारू दुकानाच्या समोरच बोबडे यांनी चहाचे दुकान थाटले. त्यानंतर उपस्थितांनी पैसे देऊन चहा विकत घेतला. चहाच्या विक्रीतून मिळालेले पैसे आंदोलनाच्या खर्चामध्ये जमा करण्यात आले. यावेळी जन विकास युवा आघाडीचे अक्षय येरगुडे ,आकाश लोडे, गितेश शेंडे, आपचे सुनील मुसळे, मयुर राईकवार, संतोष दोरखंडे, सिकंदर सागोरे, संतोष बोपचे,विजेंदर गिल, गोकुल बन्सोड, अमित पुगलिया, शाहरुख मिर्झा, नितीन झाडे,अभिजित मोहगावकर, कौसल्या मानकर, बेबीताई राठोड, लक्ष्मीबाई तोडासे ,लताबाई सलामे, पूष्‍पाबाई तोडासे ,राखी सातपुते ,वैशाली मानकर, जीवनकला पानपटे, शिलाबाई बिरमवार, पार्वती रासपायले,  मिराबाई चौधरी, जयश्री पुनवटकर, सुनील भोयर,विलास चिचवलकर, प्रफुल चौधरी, प्रविण मालेकर आदी स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.