• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या 
  ८ दुचाकी जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील विशेष पथकाने एका चोरट्याला नांदाफाटा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. नितीन नथ्यूजी मारबते (वय २१) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. 
  जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी जिल्ह्यात घडणाऱ्या वाहन चोरीच्या घटनांवर आळा घालण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेले दिले होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात विशेष पथक गठीत करण्यात आले. या पथकाने पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या जिल्ह्यातील वाहन चोरांची शोधमोहीम राबविली. 
  बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असलेल्या नितीन नथ्यूजी मारबते याला नांदाफाटा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडील वाहनाबाबत चौकशी केली. तेव्हा त्याने दोन महिन्यांपूर्वी नारंडा फाटा येथून वाहन चोरल्याचे सांगितले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने पुन्हा वाहने चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून ८ वाहने जप्त करण्यात आली.
   ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन गदादे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, संजय आतकुलवार, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, कुंदनसिंग बावरी, प्रांजल झिलपे यांच्या पथकाने केली