
महानगरालगतच्या दुर्गापूर परिसरातील एका झोपडीत एकाचा संशयास्पद मृतदेह शनिवारी आढळून आला. त्याची हत्याच असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, त्यादृटीने तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांनी दिली.
मृतकाची ओळख पटली असून, बंडू सांदेकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे .प्रथमदर्शी मृतकाच्या शरीरावर गंभिर जखमा असल्याचे त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून हत्या, गोळीबार व छेडखाणींच्या घटनांनी महानगरात गुन्हेगारी वृत्तीत वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.