• Advertisement
  • Contact
More

    दुर्गापूर परीसरात बिबट्याने महिलेच्या नरडीचा घेतला घोट, नागरिकांमध्ये दहशत

    चंद्रपूरच्या शहरालगत असलेल्या दुर्गापूरमध्ये एक भयानक दुर्घटना घडली आहे. बिबट्याने घरात जाऊन काल रात्री १२ वाजताता दरम्यान घरातच असलेल्या महिलेच्या नरडीचा घोट घेतला आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. त्या महिलेचे नाव गीता विठ्ठल मेश्राम असं आहे. ही घटना दुर्गापूरच्या वॉर्ड क्र. ३ मधील दिल्ली मोहल्ला येथे रात्री बारा वाजता घडली आहे. सदर भागात बिबट्याचे सातत्याने हल्ले होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. परंतु अद्याप बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश आले आहे. वन विभागाचे अधिकारी आणि पोलिस  घटनास्थळी दाखल झाले होते.